पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
- Advertisement -
सुपा-वाळवणे रोडवर बुधवारी रात्री लिंबाच्या झाडाखाली दहा ते बारा दिवसांचे अर्भक राणी साळुंखे यांना आढळून आले. याबाबत साळुंखे यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळील लिंबाचे झाडाजवळ गेले असता लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला.
त्याठिकाणी खात्री केली असता अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे दहा ते बारा दिवसांचे नवजात अर्भक सोडून दिले असल्याचे दिसले. पोलिसांनी साळुंखे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. साळुंखे परिवाराने दाखवलेल्या मातृत्वामुळे या 10 ते 12 दिवसांच्या बाळास जीवदान मिळाले अन्यथा थंडीत बाळाचे काही खरे नव्हते. सुपा पोलीस तपास करत आहेत.