Friday, February 6, 2026
Homeनगरखताच्या गोडाऊनला आग लागून सुमारे 75 लाखांचे नुकसान

खताच्या गोडाऊनला आग लागून सुमारे 75 लाखांचे नुकसान

बुरूडगाव रस्त्यावरील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बुरूडगाव रस्ता येथील साईनाथ अ‍ॅग्रो हायटेक गोडाऊनला मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यात गोडाऊनमधील सुमारे 75 लाख रूपयांची खते, कीटकनाशके जळून खाक झाली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

गोडाऊन मॅनेजर निखील नारायण नरोडे यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. मध्यरात्री अवधुत फुलसौंदर यांना गोडाऊनमधून धूर येत असल्याचे दिसताच त्यांनी नरोडे यांना फोन केला. त्यानंतर नरोडे व त्यांचे सहकारी आदित्य वाकळे व उध्दव गायकवाड घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोडाऊन उघडून पाहिले असता, गोडाऊनच्या मागील बाजूस आग लागल्याचे दिसून आले. अवधूत यांनी अग्निशामक दलाला माहिती देताच आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

YouTube video player

तासाभरानंतर आग आटोक्यात आली. आगीत धानुका अ‍ॅग्रीटेक, यारा फर्टिलायजर, आयसीएल फर्टिलायजर, आरएम फॉस्फेट, पुरवा कैमटेक, मायक्रो बँक्स या आणि इतर वीस कंपन्यांची खते, किटकनाशके, तणनाशके, बुरशी नाशके यांचा साठा जळून खाक झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपूर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur प्रशासक राज संपून नवीन पदाधिकारी सत्तेवर आल्यानंतर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात खेळीमेळीत पार पडली. सभेतील सर्व विषय साधक-बाधक चर्चेनंतर...