Saturday, March 29, 2025
Homeक्राईमNashik Fraud News : खत विक्रेत्यास ५१ लाखांना गंडा; संशयित अटकेत

Nashik Fraud News : खत विक्रेत्यास ५१ लाखांना गंडा; संशयित अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खत (Fertilizer) खरेदी करून पैसे न देता एकाने खत विक्रेत्यास सुमारे ५१ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात (Indiranagar Police Station) संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) संशयितास अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, रोशन मोरे (३४, वृंदावन नगर, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी अक्षत फर्टीलायझर अँड प्लांट न्युट्रीशन प्रा. लि. कंपनीत राज्याचे रिजनल बिझनेस हेड म्हणून व्यवसाय करतात व कायदेशीर बाबी बघतात. २०१९ मध्ये कंपनीच्या मालाची विक्री करण्यासाठी डिलर नेमण्यात आले. त्यानुसार, सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) डिलरशिपसाठी रायगड कृषी उदयोगचे संचालक संशयित सागर कैलास शिंदे यांच्या सोबत कंपनीचे डीलरशीप दिली. त्यानंतर मोरे यांनी ४० लाख ९० हजार ६९४ रूपयांचा खते दिले. तसेच खतांचे पैसे ६० दिवसांत कंपनीस परत करण्याचा करार करण्यात आला.

मात्र, ३१ मे ते १५ जुलै २०१९ या कालावधीत शिंदे यांना खते दिल्यानंतर खताचे पैसे (Money) घेण्यासाठी मोरे गेले. त्यावेळी संशयित शिंदेने अवघे एक लाख रुपये दिले व पैसे देण्यासाठी मुदत मागितली. मात्र ऑगस्ट २०१९ मध्ये शिंदेने दुकान बंद करून पळ काढला. मोरे यांनी पैशांसाठी वारंवार संपर्क साधला असता शिंदेने पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे मोरे यांच्या फिर्यादीनुसार, शिंदे विरोधात फसवणूकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार खतांचे सुमारे ४१ लाख रुपये व कंपनीच्या अटी शर्थींनुसार व्याज मिळून ५१ लाख २७ हजार २७४ रुपयांचा फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

धनादेशही वटला नाही

संशयित शिंदे याने कंपनीस सुमारे ५१ लाख रुपयांचा धनादेश मे २०२२ ला दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे कंपनीच्या प्रतिनिधीने शिंदेविरोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली असून तपास सुरु आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...