Wednesday, November 11, 2026
HomeनगरLeopard Death : दोन बिबट्यांमध्ये पाणी पिण्यावरून भीषण संघर्ष; एका बिबट्याचा मृत्यू!

Leopard Death : दोन बिबट्यांमध्ये पाणी पिण्यावरून भीषण संघर्ष; एका बिबट्याचा मृत्यू!

खंडाळा | Khandala

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील खंडाळा गावाच्या बारा जांभळी परिसरात दोन बिबट्यांमध्ये (Leopard) पाणी पिण्यावरून झालेल्या संघर्षात एका बिबट्याचा मृत्यू (Leopard Death) झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वन्यजीवांच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील बारा जांभळी (Bara Jambhali) परिसरात मेंढ्यांना पाणी पिण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून एक छोटेसे टाकीवजा तळे तयार करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मेंढ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येते. याच ठिकाणी पहाटेच्या सुमारास दोन बिबटे पाणी पिण्यासाठी आले होते. मात्र, पाणी पिण्यावरून त्यांच्यामध्ये अचानक संघर्ष सुरू झाला. दोन्ही बिबट्यांमध्ये जोरदार झटापट झाली. या संघर्षात मोठ्या बिबट्याने लहान बिबट्यावर हल्ला (Leopard AttacK) केला. या हल्ल्यात लहान बिबट्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.

सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकारी कानडे साहेब यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी त्याला वनविभागाच्या (Forest Department) ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण मदतकार्यात खंडाळा गावातील सुजित डेंगळे, तुषार सदाफळ, अविनाश सदाफळ, प्रतीक सदाफळ, तेजस सदाफळ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य केले.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...