Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाFIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी उठवली

FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी उठवली

दिल्ली | Delhi

सर्वोच्च न्यायालयानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची प्रशासकीय समिती बरखास्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ-फिफानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी उठवली आहे.

- Advertisement -

या निर्णयामुळे ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या सतरा वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कामकाजात तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावाच्या कारणावरून फिफानं १५ ऑगस्ट रोजी भारतीय महासंघाला निलंबित केलं होतं. दरम्यान, फिफाच्या या निर्णयावर केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या