Saturday, May 4, 2024
Homeनाशिकपन्नास टक्के शिक्षकांना कामावर रूजू होण्याचे आदेश

पन्नास टक्के शिक्षकांना कामावर रूजू होण्याचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शाळांमधील 50 टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर सेवकांनी तत्काळ कामावर रूजू होण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

- Advertisement -

ऑनलाईन, ऑफलाईन आणि दुरस्थ शिक्षणाशी संबंधित कामांसाठी शिक्षणांना शाळेत हजर राहवे लागणार आहे. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाने जारी केला आहे. मात्र, त्याला मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने विरोध दर्शविला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शाळा प्रत्यक्ष सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना देण्यात आले होते. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता शाळांमध्येही 50 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र ऑनलाईन, ऑफलाईन किंवा दुरस्थ शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. ऑनलाईन, ऑफलाईन, दुरस्थ, टेलि काउंसिलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विना अनुदानित या सर्व शाळांमधील 50 टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक यांनी ऑनलाईन, ऑफलाईन, दुरस्थ शिक्षणाशी संबंधित कामाकाजासाठी तत्काळ कामावर रुजू व्हावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

या निर्णयाला मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने विरोध दर्शविला असून जोवर शिक्षण विभाग स्पष्ट आदेश देत नाही, तोवर परिस्थितीत बदल न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या