Monday, May 20, 2024
Homeनाशिकपन्नास टक्के जागांवर प्रकल्पग्रस्तांना नेमणार

पन्नास टक्के जागांवर प्रकल्पग्रस्तांना नेमणार

दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

महाजनकोने ( Mahajenco) आपल्या तिन्ही कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना ( project victims )सामावून घेताना पन्नास टक्के जागा राखीव ठेवाव्यात व त्याबाबतचा अहवाल येत्या सात दिवसात सादर करार्वों असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut ) यांनी महाजनकोच्या अधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती आ. सरोज अहिरे ( MLA Saroj Ahire ) यांनी दिली.

- Advertisement -

एकलहरे येथील प्रकल्पग्रस्तांचा प्रलंबित असून प्रकल्पग्रस्तांना महाजनकोच्या महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही कंपन्यांमध्ये 50 टक्के आरक्षण देऊन नियुक्ती देऊन महावितरण वगळता इतर कंपन्यांनी कौटुंबिक विमा पॉलिसी राबवावी, अशी मागणी आ. अहिरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली होती. गेल्या तीन महिन्यात यासाठी तीन बैठकाही घेण्यात आल्या होत्या.

काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत आ. आहिरे यांनी एकलहरे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय देणे गरजेचे असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सरकारची देखील हीच भूमिका असून याबाबतचे आदेश महाजनकोला देण्यात येतील. तसेच या विभागात लवकरच मेगा भरती करणार असून चतुर्थ श्रेणी अंतर्गत अर्धकुशल प्रशिक्षणार्थींना तीनही कंपन्यांमध्ये सामावून घेण्याचा अहवाल सादर करण्यासह कौटुंबिक विमा पॉलिसीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

अकुशल प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण काळात आयटीआयची पदवी घेतली त्यांना कुशल कामगार म्हणून सामावून घेतले जाईल, असे राऊत यांनी सांगितले. यावेळी कोटमगावचे सरपंच बाळासाहेब म्हस्के, कृती समितीचे पदाधिकारी, अध्यक्ष समाधान लोणे, मनोज नेहे, किरण पेखळे, मोहन म्हस्के, सुरज म्हस्के आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या