Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यासातपूर विभागात पक्षीय वर्चस्वासाठी लढती रंगणार

सातपूर विभागात पक्षीय वर्चस्वासाठी लढती रंगणार

नाशिक । रवींद्र केडिया | Nashik

सातपूर (satpur) परिसर हा पहिल्या पंचवार्षिकला काँग्रेसचा (congress) बालेकिल्ला होता. कालांतराने तो बालेकिल्ला शिवसेनेच्या (shiv sena) हातात गेला आणि आता सेना-भाजप (bjp) या दोघांचेही वर्चस्व प्रभागांमध्ये विखुरले आहे.आता मात्र काँग्रेसचे अस्तित्व अजिबात जाणवत नाही.

- Advertisement -

तर राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) आपल्या अस्तित्वासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. या निवडणुकीत (election) वर्चस्व निर्माण करण्यासाठी महापौरपदाची (post of mayor) उमेदवारी निर्णायक ठरणार आहे.

प्रभागांची रचना (Structure of wards) जाहीर झाली असली तरी आरक्षणानंतरच इच्छुकांची आणि उमेदवारांची जोडबांधणी स्पष्ट होणार आहे. सातपूर हा संमिश्र वसाहतीचा परिसर आहे. यात मोठ्या प्रमाणात उच्च, मध्यम, कामगार कष्टकरी, शेतकरी (farmers) बांधवांचे वास्तव्य आहे. जातीनिहाय विचार केला तर या भागात 8-9 झोपडपट्टी आहेत. संजीव नगर, आझाद नगर सारखा मुस्लिम बहुल भाग, शेरीन मेडोझ, रामेश्वर नगर, नवश्या गणपती मंदिर परिसरासारखा उद्योजक, व्यापारी, अधिकारीवर्ग यां उच्चभ्रू लोकांना परिसर,

सातपूर (satpur), पिंपळगाव (Pimpalgaon), गंगापूर (gangapur), सोमेश्वर (someshwar) हा शेतकरी बांधवांचा परिसर तसेच श्रमिकनगर, राधाकृष्णनगर हा उत्तर भारतीय नागरिक वसाहतीचा परिसर आहे. यासोबतच सातपूर कॉलनी,समता नगर, श्रीकृष्ण नगर, निळकंठेश्वर, जाधव संकूल, राज्य कर्मचारी वसाहत, शिवाजीनगर,ध्रुवनगर हा मध्यम, उच्च वसाहतीचा परिसर समाविष्ट आहे. 7-8 स्लम भागात बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आहे. कामगार बहुल भाग असल्याने या भागात सिटूच्या माध्यमातून माकप समर्थकांची संख्या देखिल जास्त आहे.

महानगरपालिका स्थापनेपासून हा परिसर काँग्रेस (congress) व शिवसेनेचा (shiv sena) बालेकिल्ला होता. कालांतराने काँग्रेसला परिसरातून प्रबळ नेतृत्व न मिळाल्याने काँग्रेसची या भागातून पिछेहाट झाली. परिणामी शिवसेनेने पाय घट्ट रोवले ते आजतागायत. शिवसैनिकांचे मोठे मोहोळ या भागात तयार झाले. वसाहतीच्या आधारावर या भागात समाज मतांची वोटबँक तयार होऊ लागली.

परिणामी समाज, प्रांत, जातीच्या वोटबँक (vote bank) तयार होऊ लागल्या. त्यातूनच पक्षनिष्ठापेक्षा व्यक्तीनिष्ठा वाढू लागली. त्यामुळे या भागात दिनकर पाटील (dinkar patil), विलास शिंदे (vilas shinde), प्रकाश लोंढे (prakash londhe), मधुकर जाधव, शशिकांंत जाधव हे सातत्याने निवडणुकीत यश मिळवत आले आहेत. पूर्वी सातपूर विभागात भाजपचे अस्तित्व नव्हते. मागील पंचवार्षिकपर्यंत सातपूरमध्ये भाजपचा केवळ एक मात्र नगरसेवक होता. मात्र मागील पंचवार्षिकात मोदी लाटेच्या प्रभावाने भाजपने 9 जागा जिंकून परिसरातील प्राबल्य वाढवले. यात काही अंशाने सोशल इंजिनियरिंगदेखील कामाला आले.

पाच कि सात प्रभाग

सातपूर परिसरात सद्यस्थितीत पाच प्रभागांमधून वीस नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीसाठी सद्यस्थितीत तरी पाचच प्रभाव दिसत आहेत. मात्र अंबड लिंक रोडवरील (Ambad Link Road) चुंचाळेपर्यंतचा प्रभाग 34 व आयटीआय पुलापासून पपया नर्सरीपर्यंतच्या (Papaya Nursery) परिसराचा समावेश असलेला प्रभाग तेहतीस सातपूरला जोडला जाण्याची शक्यता आहे. त्यांची जोडणी झाल्यास सातपूर हा सात प्रभागाचा म्हणजेच एकवीस नगरसेवकांचा विभाग होईल. मात्र या विभागाच्या जोडण्याची घोषणा झालेली नसल्याने सध्या सातपूर पाच प्रभागांमध्ये बांधलेला आहे.

विविध पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी सातपूरला

सातपूर विभागातील तसे प्रबळ दावेदारांमध्ये पक्षीय स्तरावर फार मोठी पकड नसली तरी शहराच्या वरिष्ठ पदांवर जाण्याची क्षमता असलेले लोकप्रतिनिधी सातपूरला आहेत. एकदाच दशरथ पाटील यांच्या निमित्ताने सातपूरने महापौर पदाला गवसणी घातली होती. त्यानंतर मात्र अनेक वेळा महापौरपदाची हुलकावणी मिळाली आहे.स्थायी समिती, सभागृहनेते पद, गटनेतेपद सातपूरला मिळाले असले तरी सर्वोच्च प्रथम नागरिकाचा मान मात्र मिळाला नाही.

मागील तीन दशकात आकर्षणाचे केंद्र ठरणारा एकही प्रकल्प सातपूर परिसरात उभारला गेला नाही. ज्या माध्यमातून शहराचे लक्ष सातपूरवर केंद्रित होईल अथवा पर्यटनानिमित्ताने सातपूरमध्ये असा कोणताही विकास दिसून येत नाही. याबद्दल सातपूरकर नेहमी खंत व्यक्त करीत आले आहेत.

निवडणुकीनंतर स्पष्ट होईल वर्चस्व

नाशिकचे प्रथम महापौर शांतारामबापू वावरे यांच्या कार्यकाळात सातपूरला काँग्रेसचे वर्चस्व दिसून येत होते. सातपूर चे माजी नगराध्यक्ष रामचंद्र निगळ, दिलीप निगळ, मंगला निगळ यांच्या माध्यमातून सातपूरला काँग्रेसचा झेंडा रोवला होता.त्यानंतर सातपूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला होता. मागील निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या अंतर्गत वादातून वर्चस्व काही अंशाने मागे खेचले गेले. मात्र दुसर्‍या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार अल्पशा मतांनी पराभूत झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

बदललेली प्रभाग रचना

पूर्वीचा प्रभाग 8 आता प्रभाग 11 च्या नावाने ओळखला जाईल. यातील काही भाग वगळता संपूर्ण प्रभाग तसाच ठेवण्यात आला असल्याने या ठिकाणी निवडून आलेल्या चारही शिवसेनेच्या नगरसेवकांना भाजपकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप शिवसेनेचे वर्चस्व कसे मोडून काढते याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या प्रभागातून शिवसेना गटनेते विलास शिंदे व सातपूर प्रभाग माजी सभापती संतोष गायकवाड हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या प्रभागातून कैलास जाधव, नारायण जाधव, अ‍ॅड.महेंद्र शिंदे, प्रवीण पाटील, अमोल पाटील, उषा बेंडकोळी आदींसह इच्छुकांची संख्या मोठी आहे.

पूर्वीचा प्रभाग 9 आणि आत्ताचा प्रभाग 12 हा अतिशय सुटसुटीत आणि सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जात आहे. या प्रभागातून मनपा राजकारणात अतिशय कडव्या पद्धतीने लढा देणारे भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली चारही नगरसेवक निवडून आले होते. त्या निवडणुकीतही त्यांना शिवसेनेने कडवे आव्हान दिले होते.

या प्रभागात माजी महापौर दशरथ पाटील हे आपले पुत्र प्रेम पाटील यांना शिवसेनेच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी करीत आहेत. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असलेले दशरथ पाटील यांच्या मुलाने पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. प्रेम पाटील, करण गायकर, दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, साहेबराव जाधव, माळी दादा यांच्या माध्यमातून निवडणुकीत कडवे आव्हान उभे केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूर्वाश्रमीच्या प्रभाग क्रमांक 10 आणि आत्ताचा प्रभाग क्रमांक 13 यात अनेक भाग जोडले गेल्याने प्रभागाचे पारंपरिक मतदार विखुरले गेले असल्याचे दिसून येते. या प्रभागात प्रभाग 9 व प्रभाग 10 चा परिसर समाविष्ट झाल्याने विद्यमान नगरसेवकांपेक्षा नव्या उमेदवारांना इथे जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे. या भागात नगरसेविका इंदुमती नागरे, हेमलता कांडेकर, माजी नगरसेविका सुरेखा नागरे, माजी नगरसेवक राजेंद्र नागरे यांच्यासह अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.पूर्वीचा प्रभाग क्रमांक 11 आणि आताचा प्रभाग 14 याची तोडफोड झाल्याचेही दिसून येते.

या प्रभागाची रचना करताना अनेक भागांना वगळण्यात आले असून नवीन भाग सोडण्यात आला आहे. या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे यांचे हक्काचे मतदान अबाधित राहिलेले असले तरी सीमा निगळ व दीक्षा लोंढे यांच्यासाठी काही अंशाने प्रभाग अडचणीत ठरण्याची शक्यता आहे.

या प्रभागातून इच्छुकांची संख्या देखील मोठी असणार आहे. यात प्रामुख्याने सलीम शेख, योगेश शेवरे, सीमा निगळ, शशी जाधव, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील या विद्यमान नगरसेवकांसह अन्य डझनभर इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात वृषाली सोनवणे ,समाधान देवरे, बाळासाहेब जाधव, माजी नगरसेवक नंदू जाधव, मंदा गवळी, रवी देवरे, धीरज शेळके, देवा जाधव आदींसह अनेक नेते इच्छुक आहेत.

पूर्वीचा भाग 11 आताचा प्रभाग 15 हा बहुजन समाजाचा प्रभाग झाला आहे. बहुजन समाजाची मते असलेले स्वारबाबानगर, संतोषीमातानगर, संत कबीर नगर, प्रबुद्ध नगर या कष्टकरी व कामगार वसाहतीचा समावेश आहे. या भागात बहुजन समाजाचे प्राबल्य असल्याने बहुतांश आरक्षण पडण्याची शक्यता आहे. विद्यमान नगरसेविका दीक्षा लोंढे, नगरसेवक प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका सुजाता काळे, सविता काळे, सुगंधा काळे, भिवानंद काळे, ज्योती शिंदे, बजरंग शिंदे, अर्जुन धोत्रे, राहुल पाटेकर, सुनिता कर्डक आदी अनेक इच्छुक आरक्षणाची वाट पाहून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या