कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
शहरातील मध्यावर्ती भाग असलेल्या 105, इंदिरानगर मावळा चौफुली येथे रविवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. यावेळी दगडफेक करण्यात आली. यात शीतल सुनील पगारे ही महिला जखमी झाली आहे. याबाबत पोलिसांनी 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ताणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शहर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धरपकड सुरू केली आहे.
कोपरगाव शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा, कोळगाव थडी येथे धार्मिक ग्रंथांची विटंबना त्यानंतर होत असलेली आंदोलनांमुळे अशांतता निर्माण झालेली आहे. अशातच रविवारी रात्री अकराच्या सुमारास शहरातील इंदिरानगर येथे तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाली. यावेळी लाकडी दांड्याने एकमेकांवर चाल करून तरुणांची टोळके जात होते. किरकोळ स्वरूपात दगडफेकही झाली. त्यात शीतल सुनील पगारे ही महिला जखमी झाली आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, भरत दाते आदींनी भेट दिली आहे. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण घुले यांच्या फिर्यादीवरून एजाज सलीम शेख, साहिल गुलाब शेख, इरफान शकील शेख, ऋत्विक कुर्हाडे, वैभव मुकेश कुर्हाडे, चेतन जाधव, कुणाल भंडारी, पवन रोकडे, गुडी उर्फ विशाल गुलाब वाडेकर, सलीम लतीफ शेख, किरण शिवलाल लहीरे, फैसल कागद शेख, अबू शाबान शेख, गुलाब सांडू शेख, नकुल धर्मराज ठाकरे, अजय पाटील, भुर्या उर्फ करण गायकवाड, आदीं 17 जणांसह अन्य अनोळखी 4-5 जणांविरुध्द कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 413/2023 भा.द.वि. कलम 308,323, 147, 148,149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर हे करत आहेत.