Saturday, May 4, 2024
Homeजळगावभाजपच्या प्रविण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करा!

भाजपच्या प्रविण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करा!

जळगाव – Jalgaon

भाजपचे (BJP) विधान परिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) तसेच महिलांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलने होवूनही दरेकर यांनी माफी मागितली नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. त्याच पार्श्‍वभूमिवर प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा मागणीसाठी बुधवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे जळगाव शहरातील (District Police Thane) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षकांना निवदेन देण्यात आले.

- Advertisement -

भाजपचे विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तसेच महिलांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आदेशाने राज्यभरात आंदोलने करण्यात आली. मात्र अद्यापर्यंत दरेकर यांनी माफी मागितलेली नाही. आता प्रवीण दरेकरांवर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग बुधवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे प्रवीण दरेकर यांच्याविरोधात राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचवित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बदनामी करुन महिलांच्या विनयशिलतेला धोका पोहचविल्याने भारतीय दंडविधान कलम १५३ ब, ५०० ब व ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.

…तर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार

मागणीचे निवेदन जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगला पाटील, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ, शालीनी सोनवणे, रत्ना बागुल, विमल मोरे, सुमन बनसोडे, सीमा गोसावी, बबीता तडवी, शकिला तडवी, पिनाज फनीफंदा, मीनाक्षी चव्हाण, सुवर्णा पवार यांची उपस्थिती होती. जर सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर उपोषणाचा इशाराही यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे महानगराध्यक्षा मंगला पाटील यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या