Saturday, May 18, 2024
Homeजळगावआर्मी जवानाने केली पोलिसांची धुलाई

आर्मी जवानाने केली पोलिसांची धुलाई

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

शहरातील भर वस्तीत असलेल्या वीरसावकर चौकातील आर्योपहार हॉटे जवळ नेमणूकीस असेल्या वाहतुक शाखेच्या (police) पोलिसांनी मोटारसायकल (Motorcycle) जोरात चालवित असलेल्या आर्मी जवानास अडवून विचारपूस केली, याचा राग आल्याने आर्मी जवानानी मोटार सायकलवरून खाली उतरून, दोघा वाहतूक शाखेच्या पोलिसांची कॉलर पकडून त्याना मारहाण केल्याची घटना दि,१४ रोजी घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की काल दि.१४ रोजी सायंकाळी सहा वाजता येथील आर्योपहार हॉटेल जवळील वीरसावकर चौकातून स्टेशन रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे वेगाने जाणारी मोटरसायकल क्रमांक एम. एच.१९ बी. आर. १७ २९ ही जोराने जात असताना, या ठिकाणी नेमणुकीस असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील यांनी अडवून त्याला हे गर्दीचे ठिकाण आहे. वाहन हळू चालवा असा समज दिल्याचा राग मोटर सायकल चालक भूषण दिलीप जाधव राहणार ओढरे (शिंदी) ता. चाळीसगाव याला दिला.

पोलिसांच्या या सल्ल्याचा राग येऊन भूषण जाधव याने मोटर सायकल बाजूला लावून मी आर्मी मॅन आहे असे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांची कॉलर पकडत शिवीगाळ केली. तसेच पोलीसास गालावर चापट आणि मारहाण केली. यावेळी सोडविण्यास आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील यांचीही कॉलर पकडत त्यांनाही मारहाण केली. यावेळी दोघा पोलिसांच्या अंगावरचा सरकारी ड्रेसही फाडला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील यांचे तक्रारीवरून भूषण जाधव यांचे विरोधात कलम ३५३ / ५०४ /५०६ मोटर व्हीकल का. १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या