Tuesday, May 20, 2025
Homeधुळेशहरातील रस्ते चोरींला जाण्याआधी खड्डे बुजवा

शहरातील रस्ते चोरींला जाण्याआधी खड्डे बुजवा

धुळे Dhule। प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील कॉलनी परिसरात तसेच मनपा हद्दवाढीतील (Municipality limits will be increased) 11 गावांमधील रस्ते खड्डेमय (roads are potholed) झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव व अगामी काळातील सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खड्डेमय रस्त्यांची युध्दपातळीवर डागडूजी करावी. तसेच 22 लाखांचा रस्ता चोरीप्रकरणी (case of road theft) चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आज जिल्हा शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने महापालिकेच्या (Municipal Corporation) प्रवेशद्वारावर आंदोलन (Protest at the entrance) करण्यात आले. तसेच आयुक्त देविदास टेकाळे यांना घेराव (Commissioner Devidas Tekale besieged) घालत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांचे अस्तित्व व ओळखही संपल्यात जमा आहे. त्यामुळे शहरात रस्ते चोरी करणारी टोळी सक्रीय झाली आहे. महापौरांच्या प्रभागातील बडगुजर प्लॉट भागात तीन महिन्यांपूर्वी तयार झालेला रस्ता आणि 8 दिवसांपूर्वी ज्याचे 22 लाखांचे बिल प्रशासनाने दिले तो रस्ता चोरीला गेल्याचे स्थायी समितीत एका सदस्याने निदर्शनास आणून दिले.

22 लाख रुपयांचे बिल देवून पुर्ण झालेला रस्ता, तो पुन्हा कोणी खोदला? तो रस्ता खरच बनवला होता की, न बनविता बिल काढले गेले? यात कोणा-कोणाचा सहभाग आहे, हे धुळेकरांसमोर यायला हवे. रस्त्यांबाबत आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा. शिवसेना देखील याकामी आपल्याला सहकार्य करेल. असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आ.प्रा.शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ.सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देविदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे, माजी जिल्हा प्रमुख भूपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, नरेंद्र परदेशी, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, महिला संघटीका हेमा हेमाडे, डॉ.जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, संदीप सूर्यवंशी, पुरुषोत्तम जाधव, रवि माळी, विनोद जगताप, सुनिल पाटील, रामदास कानकाटे, जवाहर पाटील, उपमहानगर प्रमुख शेखर वाघ, हा.रफिक पठाण, मच्छिंद्र निकम, संजय जवराज, प्रवीण साळवे, संदीप चव्हाण, शुभम मतकर, निलेश वाघमोडे, कपिल लिंगायत, किरण भूरे, गायत्री लगड, कुंदा मराठे, प्रतिभा सोनवणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

22 लाखांचा रस्ताच झालाच नाही

रस्ता चोरीला गेल्याचा आरोप चुकीचा आहे. प्राची मेडीकल ते पारोळारोडपर्यंत 22 लाखांचा रस्ता झालेलाच नाही. शिवसेना ही आंदोलनाचा केवीलवाणा प्रयत्न करत आहे. त्यांना कधी जनाधार मिळालेला नाही. त्यामुळे प्रसिध्दीसाठी असे खोटे आरोप करीत आहे, आरोप करण्यापूर्वी त्यांनी अगोदर संपूर्ण माहीती घ्यावी, केवळ अर्धवट माहितीच्या आधारे आंदोलन करु नये, असे महापौर प्रदीप कर्पे म्हणाले.

…तर राजीनामा देईन

रस्ता चोरीला गेल्याबाबत काल स्थायी समिती सदस्य नागसेन बोरसेंनी प्रश्न उपस्थित केला होता. तो आरोप नव्हता. त्यामुळे आपण स्वतः प्रत्यक्ष जावून रस्त्याची पाहणी केली. तेव्हा असे कोणतेही काम झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी पुर्वी जो रस्ता झालेला आहे, त्यापुढील रस्ता केला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही रस्त्यांची लेव्हल मॅच करण्यासाठी पुर्वीचा रस्ता 66 फुटापर्यंत खोदला आहे.

हेच तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. त्यामुळे शिवसेनेचे आंदोलन हे चुकीचे आहे. शहनिशा न करता शिवसेनेची मंडळी महापालिकेवर मोर्चा आणतात. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. त्यांनी अडीच वर्षे आरोप करण्यापलिकडे कोणतेही विधायक काम केले नाही. कर वाढीबाबतही त्यांनी समोर येवून चर्चा करावी. करवाढ केली असल्याचे सिध्द झाल्यास आपण स्थायी समिती सभापती पदाचा राजीनामा देवू, असे शितल नवले यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...