Sunday, September 22, 2024
Homeजळगावआज अंतीम निर्णयाची शक्यता ?

आज अंतीम निर्णयाची शक्यता ?

मुंबई । Mumbai

- Advertisement -

शिवसेना पक्षाचं नाव (Shiv Sena party name) आणि धनुष्यबाण पक्ष (arrow party symbol) चिन्हावरून ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde group) आमनेसामने आलेले आहेत. यावर मागील आठवड्यात निवडणूक आयोगामध्ये सुनावणीही पार पडली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगासमोरील (Election Commission) युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा आता सोमवारी सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये (Hearing) अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांना लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला असून 40 आमदार, 12 खासदार आणि अनेक पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे.

तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी, काही आमदार व खासदार आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे.

शिंदे व ठाकरे गटाने आपल्या दाव्यांच्या पुष्टयर्थ लाखो शपथपत्रे, कागदपत्रे आणि आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले सादर केले आहेत. दरम्यान सोमवारी होणार्‍या सुनावणीकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या