Thursday, April 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूज'त्या' दाम्पत्यावर शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

‘त्या’ दाम्पत्यावर शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

नाशिक। प्रतिनिधी Nashik

वृद्धापकाळात ७६ वर्षीय पत्नीच्या ब्रेनट्युमरसह आजारापणाला कंटाळून ७८ वर्षीय पतीने तिचा गळा आवळून खून केल्याची व त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना जेलराेड परिसरातील सावरकर नगरात बुधवारी (दि. ९) रात्री उघडकीस आली हाेती. दरम्यान, या प्रकरणात उपनगर पाेलिसांनी मृत पतीवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा नाेंदवून स्वत: आत्महत्या केल्याबाबत आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. तर, गुरुवारी(दि. १०) दुपारी या पती -पत्नीवर त्यांची मुले व कुटुंबाच्या हजेरीत शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नातलग व स्थानिक नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. तेव्हा त्यांचे डाेळे पाणावले हाेते.

- Advertisement -

सावरकरनगरातील एकदंत अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी (वय ७८) हे निवृत्त शिक्षिका असलेली पत्नी लता यांच्यासह राहत होते. त्यांना दाेन मुले असून एक प्राचार्य तर दुसरा लघुउद्याेजक आहे. दरम्यान, लता यांना २०१७ पासून मेंदूविकाराचा त्रास उद्भवला हाेता. उपचार सुरु असतानाच अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. त्यातून त्या सावरल्यानंतर दाेघे पती-पत्नी एकमेकांना सावरत हाेते. पण, वृद्धापकाळ व त्यातील आजारपणास दाेघेही कंटाळले होते.

राेजचे दिवस कंठत असतानाच, बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जोशी यांनी लताचा गळा आवळून खून केला. तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हे सर्व कृत्य करण्यापूर्वी जोशी यांनी सुसाईड नाेट लिहून ‘पत्नीला स्वर्गलोकी पाठवले आहे, मी तिच्यासोबत जात आहे, आमच्या मरणास कुणालाही कारणीभूत ठरवू नये’, असे लिहून गळफास घेतला. त्याचवेळी घरकाम करणारी महिला घरी येताच, तिला दाेघांचे मृतदेह दिसले. तिने आरडाओरड करुन नागरिकांना व पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, निरीक्षक संजीव फुलपगारे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व फाॅरेन्सिक टीम दाखल झाली.

ज्येष्ठांनाही रडू काेसळले
जाेशी दाम्पत्याचे आजूबाजूला व रहिवाश्यांशी सलाेख्याचे संबंध हाेते. पण, आजारपणाला ते कंटाळले हाेते. जाेशी हे मितभाषी हाेतेच, पण ते आतून खचले हाेते. ते परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघात कार्यशील हाेते. त्या ज्येष्ठांनी शाेक व्यक्त केला. परंतु, मुरलीधर यांनी माेलकरणीन वर्षा हिच्या नावे पन्नास हजार रुपये बाजूला काढून ठेवत दाेघांच्या अंत्यसंस्काराचा खर्च वेगळा काढला आहे, असे लिहून जीवाचा त्याग केला.

आयुष्य संपवण्याबाबत बाेलले?
मुरलीधर यांनी काही महिन्यांपूर्वी प्राचार्य असलेल्या माेठ्या मुलासह लहान्याकडे मानसिक व शारीरिक समस्येबाबत चर्चा करुन एकटेपणामुळे जीवन नकोसे झाले आहे, अश्या स्वरुपाची भूमिका मांडली हाेती. दरम्यान, मुलांबाबत तक्रार नसल्याचे सुसाईडनाेटनुसार कळते, असे पाेलिसांनी सांगितले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वृद्ध भाविकाचा चक्कर येऊन मृत्यू

0
लोहणेर । वार्ताहर Lohner चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त भगवती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी प्रवास करणार्‍या एका वृद्ध भाविकाचा आंघोळ केल्या नंतर चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...