Monday, May 27, 2024
Homeनाशिकअंतिम वर्षातील विद्यार्थीही भरू शकणार टीईटी अर्ज

अंतिम वर्षातील विद्यार्थीही भरू शकणार टीईटी अर्ज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या ( D.Ed, B.Ed course )अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या (Studying in the final year )विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी – TET ) अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (Maharashtra State Examination Council )मार्फत टीईटी-2021 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा होऊ शकली नव्हती. दोन वर्षानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाटीईटी घेण्यात येणार आहे.

यावर्षी ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये डीएड आणि बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी देण्यात आलेली नव्हती. मागील प्रत्येक वेळी परीक्षा परिषदेकडून डीएड आणि बीएड शेवटच्या वर्ष धारक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येत होती, परंतु यावर्षी ऑनलाईन अर्जामध्ये तशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. करोनामुळे या अभ्यासक्रमाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे संधी नाकारण्यात येत असल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.

अखेर शासनाने राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद धोरणाशी सुसंगत राहून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेस बसण्यास संधी देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या