Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअखेर माणिकराव कोकाटे यांना क्रीडामंत्रीपद तर दत्तात्रय भरणे नवे कृषीमंत्री

अखेर माणिकराव कोकाटे यांना क्रीडामंत्रीपद तर दत्तात्रय भरणे नवे कृषीमंत्री

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना मोबाईलवर रमी खेळताना चित्रफितीत कैद झाल्याने वादग्रस्त ठरलेले माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले असून त्यांना कृषिखाते मात्र गमवावे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याकडील कृषि खात्याचा कार्यभार काढून तो आपले अत्यंत विश्वासू सहकारी दत्ता भरणे यांच्याकडे सोपवला आहे. तर भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचा कार्यभार कोकाटेंना दिला आहे.

YouTube video player

सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर येथे गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कोकाटे यांचे कृषी खाते काढण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खाते बदलाबाबतचे पत्र दिले. या पत्रानुसार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालटाचा निर्णय झाला.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...