तळोदा | श.प्र.- TALODA
येथील कॉंग्रेसच्या (Congress) दोन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुंबईत (mumbai) भाजपात (bjp) प्रवेश केला. याबाबत दैनिक देशदूतमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.
तळोदा येथील कॉंग्रेसचे नगरसेवक गौरव वाणी, सुभाष चौधरी यांचा भाजपात प्रवेश
मुंबई (ठाणे) येथील भाजपा च्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश झालाभाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. कॉंग्रेसचे नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक सुभाष चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, युवा सेनेचे शहर प्रमुख (उद्धव ठाकरे गट) देवा कलाल, यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला.
यावेळी आ.राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, भाजपा तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, ठाण्याचे नगरसेवक सुनेस जोशी, व्यापारी आघाडी अध्यक्ष दीपक कलाल,कुणाल चौधरी, संतोष माळी, भरत कर्णकार,
योगेश कलाल, किशोर कलाल, संतोष माळी, भरत कर्णकार, दुर्वेश कलाल, नरेश चौधरी, कैलास चौधरी, शरद माळी, पंकज तांबोळी, कुशल सोनार, संजय वाणी, प्रतीक तांबोळी, पंकज ठाकरे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ…