Thursday, June 13, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकर्‍यांसमोर आर्थिक संकट; टोमॅटोसह भाजीपाला दरात मोठी घसरण

शेतकर्‍यांसमोर आर्थिक संकट; टोमॅटोसह भाजीपाला दरात मोठी घसरण

पिंपळगाव ब. | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

- Advertisement -

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारावर मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक असून, प्रतिदिन दोन लाख कॅरेट टोमॅटो मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो. मागील आठवड्यात 28 ऑगस्ट रोजी बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या एका कॅरेटला जास्तीत जास्त 591 रुपये भाव मिळाला. तर कमीत कमी भाव 101 मिळाला होता आणि सरासरी बाजारभाव 485 रुपये होता. तोच बाजारभाव मंगळवारी (दि.6) जास्तीत जास्त 275 रुपये, कमीत कमी 35 रुपये, सरासरी बाजारभाव 111 रुपये होता. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एका क्रेट्समध्ये 20 किलो माल बसतो. म्हणजे तीन ते आठ रुपये प्रतीकिलो बाजार टोमॅटोला मिळत असल्याने शेतकरी वर्ग अत्यंत अडचणीत सापडला आहे…

एकीकडे पावसाची अवकृपा असताना पीक घेणे कठीण असताना शेतकर्‍यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. मध्यंतरी कांद्याचे बाजारभाव पडण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर शुल्क वाढविले. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असताना परदेशातून टोमॅटोची आवक करण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही निर्णय शेतकरी हिताच्या विरोधात असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.

Dahi Handi 2023 : दहीहंडी फोडताना मुंबईत दोन गोविंदा जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

टोमॅटोचे बाजारभाव घसरल्याने काल पिंपळगाव बसवंत येथे शेतकर्‍यानी रस्त्यावर टोमॅटो फेकले त्याच बरोबर बाजार समितीच्या आवारात काहीकाळ ठिय्या आंदोलन केले. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. सर्वांच्या पोटासाठी अन्न निर्माण करणे ही शेतकर्‍यांची जबाबदारी आहे. शेतकरी फक्त माणसांना, कृमीकीटक आणि प्राणीमात्रांनासुद्धा जगवत असतो. त्याच्या घामातून देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न मिळते. परंतु, आज शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एकीकडे बाजारभाव मिळत असताना दुसर्‍या देशातून शेती उत्पादनाला आयात करणे हा या देशातील शेतकर्‍यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक करण्यात आला आहे.

हा प्रकार म्हणजे त्यांच्या प्रामाणिक कष्टाचा केलेला अपमान आहे. मोदी सरकारने निर्यातीसंदर्भातील उचललेले पाऊल हे शेतकर्‍यांच्या प्रगतीला मोठा अडथळा ठरू शकते. एकीकडे कर्जबाजारी होत चाललेला शेतकरी, भरमसाठ वाढलेल्या बियांच्या किमती, पावसाअभावी न उगवलेले बियाणे, उगवूनही पावसाअभावी आज करपत असणारी पिके, यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. दिवसेंदिवस शेतीचा वाढत जाणारा उत्पादन खर्च आणि शेतमालाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न यादोन्ही गोष्टी दोन टोकाच्या बनल्या आहेत.

त्यामुळे शेतकर्‍यांच्या वाट्याला मोठी निराशा येऊन ते अंधाराच्या प्रवासाला बिंनदिक्कतपणे निघतो आहे. फवारणी औषधे घेऊन, विष प्राशन करून, गळफास घेऊन किंवा विहिरीत उड्या टाकून आत्महत्या करतो आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती आणि शेतीत काबाडकष्ट करणारा शेतकरी यांच्या आयुष्याची होळी करण्यास आज शासन पावले उचलताना दिसत आहेत.

Maratha Andolan : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढला तीन पानी जीआर; मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

शेतीमालात शेतकर्‍याला दोन पैसे मिळू लागताच निवडणुकीवर डोळा ठेवून शेतीमालाची परदेशातून आयात करून देशी बाजारपेठेतील बाजारभावांची घसरण केली जाते. ही गोष्ट कृषीप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेला सांभाळणार्‍या शेतकर्‍यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देणारी ठरत आहे. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणाबद्दल लोकप्रतिनिधींनी आपली मतं मांडली पाहिजे. परंतु, लोकप्रतिनिधीही मतांच्या पलीकडे शेतकर्‍यांबद्दल त्यांच्या मनात कसलीच आपुलकी नाही.

कारण बाजारभावाच्या संदर्भात सरकारला वठणीवर आणणारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचे काम आहे. आजही सगळेच प्रतिनिधी आपले सामाजिक कर्तव्य आणि कामांपासून कित्येक मैल दूर असल्याचे पाहणीतून दिसून येते. टोमॅटो निर्यातीच्या संदर्भात घेतलेला निर्णय हा शेतकरी हिताला किती घातक आहे याचा प्रत्यय पिंपळगाव बाजार समितीच्या रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा शेतकर्‍यांनी केलेला निषेध ही खेदाची गोष्ट आहे.

बंगळुरूचा टोमॅटो भारी

गेल्या दोन दिवसांपासून तब्बत दोन लाखांहून अधिक कॅरेट आवक पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होत आहे. 15 दिवसांपूर्वी वीस किलो क्रेट्सच्या टोमॅटोला अडीच हजार रुपये भाव होता. पण, आवक वाढूनही आज भावाला उतरती कळा लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात येणारे पीक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते. आज मोठ्या प्रमाणात टोमॅटो मार्केटमध्ये विक्रीसाठी आले आहे. त्याचबरोबर बंगळुरू, कोल्हार बाजारपेठेत गावठी टोमॅटोला परराज्यातून मोठी मागणी आहे. त्यामुळे बंगळुरुचा गावठी टोमॅटो नाशिकच्या टोमॅटोला भारी ठरत आहे. नाशिकची बाजारपेठ बंगळुरुच्या टोमॅटोने काबीज केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Pankaja Munde : “कोणीतरी घोषणा करून…”; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

- Advertisment -

ताज्या बातम्या