Friday, June 13, 2025
Homeमुख्य बातम्याएसटीला आर्थिक चणचण

एसटीला आर्थिक चणचण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सरकारने समाजातील तीस घटकांवर मोफत व सवलतीच्या एसटी प्रवासाचा वर्षाव केला. भरपाईच्या रकमेसाठी मात्र हात आखडता असल्याने एसटीचा गाडा चालवताना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेल्या एसटीचा रोज 65 लाख प्रवासी लाभ घेतात. पूर्वी 18 ते 20 कोटी रुपयांचा गल्ला रोज जमा होत होता. मात्र आता सवलतींचा वर्षाव झाल्यापासून तो रोखीचा गल्ला 12 कोटींवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दैनंदिन खर्चाला आर्थिक चणचण भासत आहे.

कर्मचार्‍यांच्या दीर्घ संपानंतर दरमहा वेतनासाठी चार वर्षे निधी देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण गेले अकरा महिने सरकारकडून पुरेसा निधी येत नसल्याने एसटी बँक, भविष्य निर्वाह निधी व उपदान अशी मिळून कर्मचार्‍यांची 960 कोटी रुपयांची देणी थकली आहेत. मदतीची परिपत्रके काढली जातात. प्रत्यक्षात मात्र निधी दिला जात नाही, अशी स्थिती आहे.

करोना व संपापासून एसटीच्या उत्पन्नाला घरघर लागली आहे. कर्मचार्‍यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीची एसटी को -ऑप बँंकेची अंदाजे 160 कोटी रुपये इतकी रक्कम महामंडळाने बँकेकडे डिसेंबर 22 पासून भरणा केलेली नाही. त्याचा फटका बँकेला बसत आहे. हीच रक्कम बँंकेने गुंतवली असती तर त्यावर अंदाजे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपयेंपेक्षा जास्त व्याज बँकेला मिळाले असते, मात्र तेही बुडाले असून त्याची झळ बँंकेला सोसावी लागत आहे. त्याचप्रमाणे भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रकमांचा एसटी कर्मचार्‍यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून वेतनातून कपात केलेल्या पीएफ व ग्रॅच्युईटीच्या रकमेचा हिस्सा थकला आहे.

सप्टेंबर 22 पासून अंदाजे 800 कोटी रुपये इतकी रक्कम ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे अंदाजे चाळीस कोटी रुपये व्याज बुडाले आहे. यामुळे ट्रस्टचे परिणामी कर्मचार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सवलत देतांना त्या तिकिटाच्या प्रतीपूर्तीची रक्कम देण्याचीही व्यवस्था दरमहा केली तरच परिवहन महामंडळाचा गाडा सुरळीत चालेल. प्रवाशांना समाधानकारक सेवा मिळेल, अशी स्थिती आहे. वेळेेवर गाड्या व चांगली सेवा मिळाली नाही तर त्या सवलतीलाही काही अर्थ राहणार नाही. सध्याचे मिळणारे उत्पन्न हे वेतन, दैनंदिन खर्चातच जात आहे.

सरकारच्या एसटी व कर्मचार्‍यांसंदर्भातील घोषणा वेगवान व गतिमान दिसत असल्या तरी मदत मात्र संथ गतीने होत असल्याने त्याचा परिणाम एसटीच्या एकंदर कामकाजावर होत आहे. त्यामुळे महिन्याला येणारी तूट भरून काढण्यासाठी तफावतीची रक्कम सरकारने तत्काळ दिली पाहिजे.

श्रीरंग बर्गे, एसटी कर्मचारी, काँग्रेस नेतेे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

NCP Sharad Pawar : तुतारीला कमळाचे वावडे? भाजप सोडून कुणाशी युती...

0
मुंबई | Mumbai राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाने भारतीय जनता...