Monday, April 28, 2025
Homeक्रीडाजाणून घ्या आयपीएलच्या प्रतिष्ठित ‘टोप्यां’चे मानकरी

जाणून घ्या आयपीएलच्या प्रतिष्ठित ‘टोप्यां’चे मानकरी

शारजाह – Sharjah

किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवालने आयपीएलमध्ये ‘ऑरेंज कॅप’ कायम राखली आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडून ‘पर्पल कॅप’ आपल्याकडे घेतली आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजाला ‘ऑॅरेंज कॅप’ देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजाला ‘पर्पल कॅप’ देण्यात येते.

- Advertisement -

अबुधाबीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध चहलने 24 धावा देऊन 3 बळी घेतले. चहलकडे आता 4 सामन्यांत 8 बळी आहेत. चहलशिवाय शमी आणि दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या 8 विकेटस आहेत. चांगली सरासरी आणि इकॉनॉमीमुळे चहल यादीत अव्वल आहे.

दरम्यान, मयांकचे 4 सामन्यात 246 धावा झाल्या आहेत. सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीत तो प्रथम क्रमांकावर आहे. राहुलला मुंबईविरुद्ध 16 धावा करता आल्या. त्याने एकूण 219 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटलने चार सामन्यांमधून 6 गुणांसह गुणतालिकेध्ये अव्वल स्थान मिळवले.

शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा 18 धावांनी पराभव केला. दिल्लीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर दुसर्?या, मुंबई इंडियन्स तिसर्?या आणि सनरायझर्स हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...