Tuesday, April 29, 2025
Homeमनोरंजनशिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल, नेमकं काय आहे...

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बरई नावाच्या व्यक्तीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, काशिफ खान यांच्यासह काही लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण २०१४ चं असून तक्रारीनुसार, १ कोटी ५९ लाख रुपयांची केले फसवणूक केल्याचे तक्रारदाराने म्हटलं.

वांद्रे पोलिसांनी कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ आणि १२० (बी) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पैशांच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कसून चौकशी होऊ शकते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....