सोलापूर | Solapur
सोलापूर शहरातील (Solapur City) अक्क्लकोट रोड एमआयडीसी परिसरातील (MIDC Area) सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला आज (रविवारी) सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत कारखान्यातील ८ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. .
याबाबत अधिक माहिती अशी की, आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास आग लागली होती. यावेळी आगीत (Fire) तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर चार ते पाच जण अडकल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मागील १३ तासाहून अधिक वेळ आगीत अडकलेल्या पाच जणांना बेशुद्ध अवस्थेत अग्निशमाक दलाच्या (Fire Brigade) जवानांनी बाहेर काढले.
त्यानंतर या पाचही जणांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात (Solapur District Hospital) तातडीने दाखल करण्यात आले होते. मात्र, या पाचही जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे या आगीत एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कामगारांच्या या मृत्यूच्या घटनेने सोलापूरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मृतांमध्ये ५ पुरुष, २ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची विनंती सरकारला (Government) करण्यात आली आहे. तर या प्रकरणात महापालिकेची यंत्रणा काही प्रमाणात कमी पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.