Saturday, April 26, 2025
HomeनगरNitesh Rane : नितेश राणेंना 'ते' वक्तव्य भोवलं, नगरमध्ये गुन्हा दाखल!

Nitesh Rane : नितेश राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं, नगरमध्ये गुन्हा दाखल!

अहमदनगर | प्रतिनिधी

अहमदनगर येथे काल महंत रामगिरी महाराजांच्या (Ramgiri Maharaj) समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) देखील सहभागी झाले होते.

- Advertisement -

सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राणे यांनी या मोर्चातही मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगरच्या तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : पुणे हादरलं! आधी गोळीबार, नंतर कोयत्याने वार करत माजी नगरसेवकाची हत्या

अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडकाऊ भाषण देणे आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

हे देखील वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतूक बंदीचा पेट्रोल पंपांना फटका

त्यानंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात एका एकाला पकडून मारु, असं विधान राणेंनी केलं होतं. यानंतर त्यांच्याविरोधात कलम ३०२ सहित अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...