Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशहाणपणा करू नका आणि आवाज चढवून बोलू नका; पोलिसांशी पंगा घेणे नडले,...

शहाणपणा करू नका आणि आवाज चढवून बोलू नका; पोलिसांशी पंगा घेणे नडले, रोहित पवारांवर गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर पोलिस स्टेशनमध्ये गेलेल्या रोहित पवार यांच्या संयमाचा बांध फुटून त्यांनी पोलिसांना याविषयी जाब विचारला. रोहित पवार आणि पोलिसांमध्ये यावेळी तू तू मैं मैं झाली. यानंतर रविवारी पोलिसांनी रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची झाली होती. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. विधीमंडळाच्या लॉबीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यांनी एकमेकांना मारहाण केली होती. या प्रकारानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री १२ वाजता विधानभवनातून अटक केली.

- Advertisement -

व्हिडीओ झाला व्हायरल
आमदार रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार हे पोलिसांवर संतापले होते. हातवारे करून बोलू नका. शहाणपणा करू नका आणि आवाज चढवून बोलू नका, असे रोहित पवार एका पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले. दोघांमध्ये वाद होत असल्याचे पाहून इतरांनी मध्यस्थी करून वाद थांबविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आता रोहित पवार यांनी पीएसआयला दमदाटी केल्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. रोहित पवार यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडिया प्रभारी योगेश सावंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आणि इशाराही दिला. योगेश सावंत यांनी लिहिले की, ‘जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास दिला तर रोहितदादा आणि जितेंद्र आव्हाड जी लढायला तयार आहेत. जर तुम्ही आम्हाला दडपण्यासाठी पोलिसांचा वापर केला तर तुम्हालाही असेच उत्तर मिळेल.’

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

२५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

0
येवला | प्रतिनिधी एका २५ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वाघाळे येथे घडली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू...