Wednesday, April 9, 2025
Homeमहाराष्ट्रFire Accident : गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू

Fire Accident : गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू

पुणे । Pune

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर येथे मध्यरात्री घडलेल्या एका भीषण घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना पत्र्याच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घडली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

ही घटना आज पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीत एका घरातील सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग झपाट्याने पसरली. स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.

आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे वातावरण धकाधकीचं बनलं. रात्रीची वेळ असल्याने अनेकजण झोपेत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आगीचा जोर आणि पत्र्याचे घर असल्याने ती आटोक्यात आणण्यात अडचणी आल्या.

या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या पोलीस आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी कार्यरत आहेत. आगीचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मंदिरातून बाहेर निघताना घंटा का वाजवत नाहीत ?

0
मंदिरात प्रवेश करताना भाविक घंटी वाजवून मगच गाभार्‍यात जातात. मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवण्यामागे आध्यात्मिक आणि धार्मिक पैलु आहेत. पण तुम्हाला माहितीये का मंदिरातील घंटीबाबत...