Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकइलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

खुटवड नगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. वेळीच अग्निशमन दलाच्या एकूण ६ बंबानी ९ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.

- Advertisement -

खुटवड नगर भागातील मुख्य रस्त्या लगत असलेल्या देवआशा इलेक्ट्रॉनिक दुकानाला शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक लागली. या दुकानाचे मालक ओमप्रकाश सदिजा व तन्मय सुराणा यांनी या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाणे व अग्निशमन दलाला दिली. वेळीच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पोहचले. सुरुवातीला सातपूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग आटोक्यात येत नसल्याने नवीन नाशिक व मुख्यालय येथून प्रत्येकी दोन दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एकूण सहा बंबांननी दहा फेऱ्या मारून अडीच तासात यश मिळवले.

या आगीत दुकानातील टीव्ही, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिन व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. आग लागली त्यावेळी इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये एकूण पाच ते सात कर्मचारी उपस्थित होते. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. घटनास्थळी मात्र मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. तसेच सौम्य लाठीमार देखील करावा लागला. आगीचे कारण मात्र समज शकले नाही. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...