Saturday, October 5, 2024
Homeनंदुरबारतळोदा येथे गुरांच्या गोठयाला आग

तळोदा येथे गुरांच्या गोठयाला आग

सोमावल – Taloda – वार्ताहर :

तळोदा येथील अक्कलकुवा रस्त्यावर असलेल्या एका शेतातील गुरांच्या गोठयाला अचानक आग लागल्याने गाय व दोन वासराचा होरपळून मृत्यू झाला. तसेच शेतोपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा येथील अक्कलकुवा रस्त्यावरील चुनीलाल वंजी पवार यांच्या शेतात असलेल्या गुरांच्या गोठ्याला काल रात्री अचानक आग लागली.

या आगीत गोठ्यात बांधलेल्या एक गाय व दोन वासरांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच बैलगाडी, चाराकटर मशीन व शेती औवजारे जळून खाक झालीत. या आगीत संबंधीत शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या