Thursday, May 15, 2025
HomeनाशिकNashik News : प्लायवूड गोदामातील आगीची धग कायम

Nashik News : प्लायवूड गोदामातील आगीची धग कायम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकमधील तपोवन आणि छत्रपती संभाजीनगर राेड परिसरातील प्लायवूडच्या दुकानांना लागलेल्या आगीत अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिकची वित्तहानी झाली आहे.

आगीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, ता दुकांनांत कुठेही आगराेधक यंत्रणा कार्यान्वित नव्हती, असे समाेर येते आहे. त्यामुळे आग कशी लागली किंवा कुणी लावली का याचा तपास करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, आगेची धग शनिवारीदेखिल कायम असल्याने, अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू हाेते.

गुरुवारी (दि.१७) मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील संत जर्नादन स्वामी शेजारील सेलिब्रेशन लॉन्स समोरील प्लायवुडच्या दुकानास आगीची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि.१८) मध्यरात्री तपोवन परिसरातील मारुती वेफर्स जवळील प्लायवूडच्या गोदामास भीषण आग लागल्याची घटना समोर आली.

आगीच्या या घटना इतक्या भीषण होत्या की, सलग दोन दिवस आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शनिवारी (दि.१९) देखील अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू आहे. तपोवन येथील आग विझविण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमधून १६ बंब आणण्यात आले होते. या बंबाच्या शंभरपेक्षा अधिक फेऱ्या झाल्या.

दरम्यान, यात कोट्यांवधींचे नुकसान झाले असून, छत्रपती संभाजी रस्त्यावरील आगीच्या घटनेत तब्बल ६० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तर तपोवनातील आगीच्या घटनेत दोन कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. दोन्ही आगीच्या घटनांचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...