Saturday, May 17, 2025
HomeUncategorizedआता शाळा, क्लासेसचे होणार फायर ऑडिट-राज्य शासनाच्या सूचना

आता शाळा, क्लासेसचे होणार फायर ऑडिट-राज्य शासनाच्या सूचना

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

राज्य शासनाने शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींमध्ये आगरोधक यंत्रणा बसविण्यात यावी, असे आदेश काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसचे फायर ऑडिट केले जाणार असल्याचे नगररचना विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

शहरातील अनेक इमारती या १५ मीटरपेक्षा उंच आहेत. यापेक्षा उंच इमारतींना आतापर्यंत फायर एनओसी घेणे आवश्यक होते. मात्र, गेल्या आठवड्यात क्रेडाईच्या सदस्यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेतल्यानंतर २४ मीटरपर्यंतच्या इमारतींना फायर एनओसी घेणे बंधनकारक नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, या इमारतीत अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे. या इमारतीबरोबर शहरातील जुन्या इमारतींचे अनेक वर्षांपासून फायर ऑडिट झालेले नाही. अशा सगळ्या इमारतींची फायर एनओसी महापालिकेकडून तपासल्या जाणार आहे. यासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी दिली.

बिल्डरला जबाबदार धरणार
१५ ते २४ मीटरपर्यंत उंच असलेल्या इमारती बिल्डरने बांधल्या. मात्र, त्यात आता रहिवासी राहत आहेत. या इमारतींची फायर एनओसी नसेल किंवा त्यात अग्निशमन यंत्रणा नसेल तर त्याला बिल्डर जबाबदार असेल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. याची तपासणी शहरातील क्लासेसपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १८९ क्लासेसची तपासणी झाली आहे. यानंतर अपार्टमेंट, व्यावसायिक इमारती, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, लॉन्स, मंगल कार्यालये यांची देखील तपासणी होणार असून फायर एनओसी घेतली की नाही, हे पाहिले जाणार आहे.

शहरात १५ मीटर उंचीच्या इमारतीत आग विझू शकेल एवढी मोठी यंत्रणा आहे. त्यापेक्षा उंच इमारतींना आग लागल्यास शिडी व इतर यंत्रणा नाही. यासाठी एक स्वतंत्र वाहन खरेदी करण्याचे नियोजन आहे. यासाठी एक कोटेशन देखील मागवण्यात आल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar News : विळदच्या सानिकाची पुणे कारागृह पोलीसपदी निवड

0
अहिल्यानगर । प्रतिनिधी नगर तालुक्यातील विळद गावातील सानिका योगेश शिंदे हिची पुणे येथील कारागृह पोलीस पदावर निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे...