Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजएसटी कार्यशाळेत आग; अकरा वाहने जळून खाक

एसटी कार्यशाळेत आग; अकरा वाहने जळून खाक

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

पेठ रोडवरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत रविवारी (दि. २० एप्रिल) दुपारी अचानक आग लागण्याची घटना घडली. या भीषण आगीत आरटीओ कडून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली तब्बल अकरा वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये नऊ रिक्षा, एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक स्विफ्ट डिझायर कार यांचा समावेश आहे.

- Advertisement -

आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट असून , प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.पेठ रोड परिसरातील ही कार्यशाळा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची असून, त्याच्या आवारातच आरटीओ विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आलेली वाहने एका बाजूला उभी करण्यात येतात. याच मोकळ्या जागेत रविवारी दुपारी अचानक धुराचे लोट दिसून आले. काही वेळातच झाडांच्या पाचोळ्याने पेट घेतल्याने आग पसरत जाऊन जवळ उभ्या असलेल्या वाहनांनी पेट घेतला.

सदरची परिस्थिती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली.माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली.जवानांनी अथक प्रयत्न करून काही वेळातच आग आटोक्यात आणली.

घटनेच्या वेळी पंचवटी अग्निशमन दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे, तसेच जवान संतोष मेहेंदरे, मनोहर गायकवाड, विजय शिंदे, विजय पाटील यांच्यासह इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझविण्याचे काम हाती घेतले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरीही जळून खाक झालेली वाहने ही आरटीओ विभागाने कारवाईनंतर जप्त केलेली असल्यामुळे त्यासंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच याबाबत स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 2075 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर...