नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
- Advertisement -
चुंचाळे घरकुल योजनेच्या जवळच असलेल्या भंगार दुकानाला पहाटे तीन वाजेच्या सुमारास आग लागली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी जवळपास आठ ते दहा दुकाने जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे…
या परिसरात सुमारे २५ ते ३० भंगारची दुकाने आहेत. या घटनेची माहिती समजताच अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी हजर होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
शेततळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू
यावेळी अंबड पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी हजर झाले. या आगीत किती नुकसान झाले व आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.