Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगोरेगावातील ४५ मजली इमारतीत आग, अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

गोरेगावातील ४५ मजली इमारतीत आग, अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

मुंबई | Mumbai
मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच धुराचे मोठे लोट संपूर्ण परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलाला सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी याबाबतची सूचना मिळाली. त्यानंतर ९ वाजून २५ मिनिटांनी आग लेव्हल-१ ची जाहीर करण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

PM Narendra Modi: बांगलादेशात १७ वर्षांनंतर बीएनपीची सत्ता; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तारिक रहमानला शुभेच्छा

अग्निशमन दलाकडून या आगीला लेव्हल-१ घोषित करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, आग बेडरूममध्ये लागून विजेची वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन आणि घरगुती साहित्यापर्यंतच मर्यादित होती. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे रिफ्यूज एरिया आणि टेरेसवर हलविण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनास्थळी ४ फायर इंजिन, ४ जंबो टँकर, अ‍ॅडव्हान्स वॉटर टँकर, टर्न टेबल लॅडर, हाय प्रेशर पंप व इतर बचाव साहित्य तैनात करण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दल, पोलिस, वीज वितरण कंपनी आणि बीएमसी कर्मचारी यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...