Tuesday, April 1, 2025
Homeब्रेकिंग न्यूजFire News : फटाका कारखान्यात भीषण स्फोट; पाच जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Fire News : फटाका कारखान्यात भीषण स्फोट; पाच जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

गुजरात | वृत्तसंस्था | Gujarat

गुजरातच्या (Gujarat) बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात (Firecracker Factory) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती ANI ने दिली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, “कारखान्यात असलेल्या बॉयलरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समजते. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात (Factory) ३० कामगार काम करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर या दुर्घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

या व्हिडीओत कारखान्यातील भिंतींचे स्फोटांमुळे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. याशिवाय स्फोटाच्या तीव्रतेमुळे इमारतीचा संपूर्ण स्लॅब कोसळून २०० मीटरपर्यंत ढिगारा पसरल्याचे दिसून येते. तसेच घटनास्थळी जिल्हाधिकारी महिर पटेल आणि SDRF पथक पोहोचले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतदेहांचा (Dead Body) शोध सुरू आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात (Hospital) उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच स्फोटाच्या तपासाचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तर डिसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी सांगितले की फटाका फॅक्ट्रीत आग लागल्याने सलग स्फोट झाले आणि आगीचा भडका उडाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Anjali Damania : “धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरोधात…”; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

0
मुंबई | Mumbai सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट...