पुणे | Pune
येथील पिंपरी-चिंचवड भागातील हिंजवडीमध्ये (Pimpri-Chinchwad Area) टेम्पो ट्रॅव्हलला आग (Fire) लागून चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,” या दुर्घटनेमध्ये सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (वय ५८, रा. नऱ्हे), गुरूदास लोकरे (वय ४०, रा. हनुमान नगर, कोथरूड), राजू चव्हाण (वय ४०, वडगाव धायरी) या चौघांचा मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे (Fire Department) पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या टेम्पो ट्रॅव्हलरमधून एकूण १२ कर्मचारी प्रवास करत होते.