मुंबई | Mumbai
दक्षिण मुंबईतील (South Mumbai) मेट्रो सिनेमाजवळ एका इमारतीच्या (Building) सर्वांत वरच्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग (Fire) विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा आणि गोल मस्जिद येथून जवळच असलेल्या एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी प्रसंगावधान दाखवत काही नागरिकांनी (Citizen) याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिली.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. तसेच सदर इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून या घटनेची नोंद करण्याचे काम पोलिसांकडून (Police) सुरू असल्याचे समजते.