Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजFire News : मरीन लाइन्स परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या...

Fire News : मरीन लाइन्स परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई | Mumbai

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) मेट्रो सिनेमाजवळ एका इमारतीच्या (Building) सर्वांत वरच्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग (Fire) विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा आणि गोल मस्जिद येथून जवळच असलेल्या एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी प्रसंगावधान दाखवत काही नागरिकांनी (Citizen) याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिली.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. तसेच सदर इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून या घटनेची नोंद करण्याचे काम पोलिसांकडून (Police) सुरू असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...