पिंपळगाव बसवंत | वार्ताहर
निफाड तालुक्यातील पिपळगाव बसवंत येथील महामार्ग लगत बाबा मंगल कार्यालया समोर खाजगी जागा काही व्यावसायी काना भाड़े तत्वावर देण्यात आले असुन यात फोटो फ्रेम, शेती उपयोगी साहित्य, पॅकिंग मटेरीयल, गॅरेज, भंगार दुकान, बांबुची वखार, कांदा शेड, रद्दी पेपरचे दुकान आदि व्यवसायिक असुन सकाळी अकरा वाजेच्या आसपास एका भेळ भत्ता बनविण्याचा गोडाऊनला आग लागली. पिपळगाव बसवंत अग्निशमन दलाचे दोन्ही बंब तातडीने दाखल झाले. सर्व दुकाने पत्र्याच्या शेडमध्ये असल्याने आगीने काही क्षणातच मोठा पेट घेतला. शेजारी रद्दी तसेच बांबुची वखार असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. नाशिक, ओझर, निफाड, दिंडोरीसह आदी ठिकाणचे बंब दाखल झाले. आगीचे स्वरूप फारच भयानक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी तीन तास लागले. या आगीत सर्वच व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन यात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा