पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
नवीन सुपा – म्हसणे फाटा औद्योगिक वसाहत परिसरात उशिरा रात्री हॉटेल चालकावर पिस्टल रोखून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.13) घडली होती. याप्रकरणी सुपा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.
- Advertisement -
संकेत प्रदीप गावडे (रा. सुपा, ता. पारनेर) यांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिली होती. सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तपास पथकाची नेमणूक केली होती. पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे नगर-पुणे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये छापा टाकून आरोपी अक्षय उर्फ आकाश संजय वाव्हळ, यश बाळू जाधव (दोघे रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर) व शुभम ठकसेन वाळके (रा. उख्खलगाव, ता. श्रीगोंदा) यांना ताब्यात घेतले. अधिक तपास सुपा पोलिस करीत आहेत.




