उत्तरप्रदेश – उत्तर प्रदेशातील कानपूरच्या डीकरू या गावात कुख्यात गुंड विकास याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर झालेल्या गोळीबारात ८ पोलिस शहीद झाले आहे.
- Advertisement -
हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या गुंडावर आतापर्यंत ६० गुन्ह्याची नोंद आहे. त्याला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी तीन पोलिस स्टेशनच्या टीम आरोपीला पकडण्यासाठी गेल्या होत्या. या हल्ल्यात एक डीएसपी, तीन सब इंस्पेक्टर तर ४ हवालदार हल्यात शहीद झाले आहे. तर अनेक पोलिस या हल्यात जखमी झाले आहे.