श्रीरामपूर । Shrirampur
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मंगळवार दि. १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वा सुमारास डॉ. संजय फरगडे, जनार्धन गालपगारे असे मातापुर येथे माझे कार्यकर्ते संजय लबडे यांची बोलेरो गाडी (एम एच १७ सीएम ७१९१) मध्ये चालक चेतन तनपुरे यांचेसह मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलो होतो. तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आम्ही चौघे बोलेरो गाडीत बसुन रात्री ०१:०० च्या सुमारास श्रीरामपुरकडे निघालो.
गाडीमध्ये चालकाच्या शेजारील सिटवर बसलेलो होतो. त्यावेळी प्रवास करत असतांना माझ्या लक्षात आले की, दोन मोटारसायकल आमचा पाठलाग करत आहेत. त्याबाबत मी माझे सोबतच्या लोकांना सांगितले. काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात अशोक कारखान्याच्या मुख्य गेटसमोर आल्यानंतर संरक्षणासाठी कारखान्याच्या गेटमधुन गाडी आत घेण्यास मी चालकाला सांगितले. चालकाने गाडी गेटकडे वळविली परंतु त्यावेळी कारखान्याचे गेट अर्धवट बंद होते. त्यामुळे आमची गाडी आत जावु शकली नाही म्हणुन चालकाने गाडी उभी केली.
त्यादरम्यान पाठलाग करणाऱ्या दोन मोटारसायकल वरील व्यक्तिनी त्यांच्या मोटारसायकल रोडच्या बाजुला उभ्या करुन
गाडीच्या समोर चालत आले. त्यामुळे मी चालकाला आमची गाडी मागे घेवुन पुन्हा श्रीरामपुरच्या दिशेने घेण्यास सांगितली. चालक तनपुरे हा गाडी मागे घेत असतांना गाडीच्या समोरील तिघांपैकी सडपातळ बांध्याच्या एका व्यक्तिने एक पिस्टल काढुन आमच्या गाडीच्या दिशेन एक गोळी फायर केली.
परंतु आमची गाडी वेगात मागे घेतल्याने ती गोळी गाडीला न लागता हवेत गेली. त्यानंतर आम्ही गाडी वेग चालवुन श्रीरामपुरच्या दिशेने आलो. श्रीरामपुरमध्ये येवुन आमचे माझे मित्र व सहकारी प्रकाश चित्ते यांच्या घरी गेलो. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला येवुन तीन अज्ञात व्यक्तिविरुध्द फिर्याद दिली.