मुंबई – Mumbai
यंदा आयपीएलचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळला जाणार आहे. सर्व संघ आधीच यूएईला रवाना देखील झाले आहेत. यंदाच्या…
आयपीएलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच एक अमेरिकन क्रिकेटपटू लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. वेगवान गोलंदाज अली खान यंदाच्या सत्रात कोलकत्ता नाइट रायडर्सकडून (केकेआर) खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, दोन वेळा विजेता असलेल्या केकेआर संघाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गर्नीच्या जागी अली खान निवडले आहे. मात्र अद्याप आयपीएलकडून यासाठी परवानगी मिळालेली नाही.
हॅरी गर्नीला खांद्याचे ऑॅपरेशन करायचे आहे, त्यामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. अली खानने आतापर्यंत 36 टी20 सामन्यात 38 विकेटस घेतल्या आहेत. 29 वर्षी अली खान त्रिनबागो नाइट रायडर्सचा देखील भाग होता. याच संघाने कॅरेबियन प्रिमियर लीगचा खिताब आपल्या नावावर केला आहे. त्याने 8 सामन्यात 8 विकेटस घेतले. 2018 मघ्ये कॅनडा ग्लोबल टी20 मध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली होती.
अली खान 140ज्ञज्प् वेगाने गोलंदाजी करू शकतो. आपल्या यॉर्करसाठी देखील तो ओळखला जातो.