Sunday, July 7, 2024
Homeनगरपहिल्याच दिवशी हसू अन् रडूही!

पहिल्याच दिवशी हसू अन् रडूही!

रांगोळी काढून, गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शनिवारी सकाळी शाळेचा पहिला दिवस होता. उन्हाळ्याची सुट्टी संपवून ताजेतवाने होवून विद्यार्थी, पालकांसोबत शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक शाळा प्रवेशोत्सवासाठी सज्ज होते. मात्र, अनेक ठिकाणी नवीन वर्ग, नवीन मित्र, नविन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हसू आणि रडू एकच वेळी दिसत होते. शनिवार (दि.15) पहिली ते दहावीपर्यंत शाळा सुरू झाल्या. शनिवार असल्याने काल सकाळीच शाळा भरल्या होत्या. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेने आनंद उत्सव साजरा करण्याच्या सुचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, मनपा शिक्षण मंडळाने दिल्या होत्या. त्यानूसार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा आणि शिक्षक सज्ज होते.

काल पहिल्या दिवशी शहरासह जिल्हा भरात शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम राबवण्यात आले. शहरात काही शाळांमध्ये रेड कार्पेट व फुलांच्या पायघड्या, पुष्पवृष्टी, श्रीगणेशा अ, आ, ई यासह 1, 2, 3 या अक्षरांनी रेखाटलेली कडधान्यांची रांगोळी, बम् बम् भोले, मस्ती मे तु डोल रे…गाण्यावर मनसोक्त नाचून चिमुकल्यांची मस्ती की पाठशाला सुरू झाली. बागडपट्टी येथील हिंद सेवा मंडळा शाळने दरवर्षी प्रमाणे यंदा वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेने शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत केले. यावेळी शाळेत रेड कार्पेट टाकून व फुलांच्या पायघड्या अंथरून पुष्पवृष्टी करत उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

केडगाव येथील भाग्योदय विद्यालयात पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देत नवगतांचे स्वागत करण्यात आले. हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प, मोफत शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आले. सविता रमेश फिरोदिया प्रशाला येथे शाळेच्या गेटवर मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिलाच दिवस असल्याने काही मुले रडतांना दिसली. यावेळी त्यांची समजूत काढतांना पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना नवीन कपडे, पुस्तके, दपत्तर देवू स्वागत करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या