Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाIPL 2023 : आज पहिला डबल हेडर सामना; 'हे' संघ भिडणार

IPL 2023 : आज पहिला डबल हेडर सामना; ‘हे’ संघ भिडणार

मुंबई | Mumbai

आयपीएलच्या (IPL)१६ व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा काल दिमाखात पार पडला. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (GT VS CSK) यांच्यात आयपीएल १६ चा पहिला सामना झाला. त्यात गुजरातने चेन्नईवर विजय मिळविला. यानंतर आज आयपीएलमध्ये पहिला डबल हेडर सामना होणार आहे…

- Advertisement -

पहिला सामना आज दुपारी ३.३० वाजता पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Punjab Kings vs Kolkata Knight Riders) यांच्यात मोहालीच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. तर दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स (Delhi Capitals and Lucknow Supergiants) यांच्यात होणार आहे.

खासदार संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

आयपीएल १६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद नितीश राणाकडे ( Nitish Rana) तर पंजाब किंग्जचे कर्णधारपद शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) आहे. नितीश राणा आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपद भूषवणार असून कोलकाता संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)आयपीएल २०२३ मध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कर्णधार आणि फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी नितीश राणाकडे असणार आहे.

दुसरीकडे लियम लिविंगस्टन आणि कगीसो रबाडा पंजाब किंग्जचे स्टार फलंदाज पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाहीत. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सप्रमाणे ४ परदेशी खेळाडू म्हणून कोणाला स्थान दयायचे ? याचे उत्तर पंजाब किंग्जला शोधावे लागणार आहे. तसेच दोन्ही संघांत आयपीएलमध्ये एकूण ३० सामने झाले असून कोलकाताने २० सामने जिंकले आहेत. तर १० सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

LPG Cylinder Price : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात, घरगुतीचे ‘जैसे थे’… जाणून घ्या नवे दर!

तर संध्याकाळच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स आमनेसामने येणार आहेत. आयपीएल २०२२ मध्ये कर्णधार म्हणून संधी मिळालेल्या लोकेश राहुलच्या नेतृत्वात लखनौ सुपरजायंट्सने मागील वर्षी बाद फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र आरसीबीविरुद्ध झालेल्या एलिमिनेटर लढतीत पराभव झाल्याने लखनौचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर आता आयपीएल २०२३ मध्ये विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने लखनौ सुपरजायंट्स सज्ज असणार आहे.

बापटांच्या निधनानंतर ४ दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ बॅनर; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

तसेच दुसरीकडे आयपीएल २०२३ पूर्वी दिल्लीचा नियमित कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant)अपघातात जखमी झाल्यामुळे आयपीएल २०२३ मध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे संघाचे कर्णधारपद डेविड वॉर्नरकडे असणार आहे. आयपीएल २०१६ (IPL 2023) मध्ये वॉर्नरच्या नेतृत्वात सनराईझर्स हैद्राबादने विजेतेपद पटकावले होते. यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल १६ ची ट्रॉफी जिंकून देण्यात डेविड वॉर्नर यशस्वी होणार का ? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या