Friday, April 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआधी PADU मशीन अन् आता निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय

आधी PADU मशीन अन् आता निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय

मुंबई | Mumbai
मुंबई सह राज्यात आज मतदानाला सुरवात झाली आहे. सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदान सुरु असतानाच ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला आहे. तर मुंबईत दुबार मतदार सुध्दा आढळला आहे. असे असतानाच मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे. माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे.

अधिकृत प्रवेशिका असतानाही मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. केवळ रांगेच चित्रीकरण करण्यास परवानगी असल्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे. मुंबईसह नाशिक, पुण्यासह अनेक ठिकाणी हा निर्णय लागू केल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisement -

BMC Elections: मतदान सुरु असतानाच मनसे उमेदवारासमोर आला दुबार मतदार; नेमकं काय झालं दादरमध्ये?

29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होईल मात्र त्यासाठीच नागरिकांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याचे चित्र आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये उत्साह दिसतो आहे. तर अनेक वर्षांनी पालिकेसाठी मतदान पार पडत असल्याने नाराजी देखील व्यक्त केली आहे. तर अनेक ठिकाणी सकाळी मतदान सुरु होताच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ३ एप्रिल २०२६ – विनाशकाले ‘ट्रम्प’बुद्धी

0
सत्ता आणि अहंकार जेव्हा डोक्यात जातो, तेव्हा लोकशाहीचा प्रवास हुकूमशाहीकडे व्हायला वेळ लागत नाही. जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मानवजातीने...