Saturday, November 23, 2024
Homeदेश विदेशGautam Adani: अमेरिकेतील लाच प्रकरणी Adani ग्रूपकडून स्पष्टीकरण; भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मांडली भूमिका!

Gautam Adani: अमेरिकेतील लाच प्रकरणी Adani ग्रूपकडून स्पष्टीकरण; भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मांडली भूमिका!

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय अब्जाधीश आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना अमेरिकेकडून मोठा धक्का बसला आहे. गुरवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराच्या व्यवहाराची सुरवात मोठ्या पडझडीने झाली. अदानी समुहाचे सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तिकडे अमेरिकेत गौतम अदाणींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि इकडे मुंबईत शेअर बाजार गडगडला. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टात लाचखोर आणि फसवणुकीचा आरोप निश्चित केला आहे. दरम्यान, आता यावर अदानी समूहाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलेय. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे निराधार असल्याचे त्यांनी म्हटलेय.

अदानी समुहाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, “अदानी ग्रीनच्या संचालकांवर अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप बिनबुडाचे असून ते आम्ही फेटाळत आहोत. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनेच म्हटल्याप्रमाणे, “हे आरोपपत्रातील आरोप आहेत आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिवादींना निर्दोष मानले जाते.” आम्ही शक्य सर्व कायदेशीर मार्ग शोधू.” असे अदानी समुहाने नमूद केले आहे.

- Advertisement -
https://twitter.com/ANI/status/1859504058064925167

दरम्यान, अदाणी समूह कायद्याचे पालन करण्यासाठी बांधील असल्याचे निवेदनात म्हटले आहे. “अदानी समूह कायमच व्यवस्थापनाच्या सर्वोच्च तत्त्वांचे पालन करत आला आहे. त्याशिवाय, कारभारात पारदर्शकता आणि कंपनीच्या सर्वच विभागात नियमांचे पालन या बाबी अदानी समूहासाठी महत्त्वाच्या आहेत. आम्ही आमच्या भागधारकांना, भागीदारांना आणि कर्मचाऱ्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की अदाणी समूह हा एक कायद्याचे पालन करणारा समूह असून सर्व कायद्यांचा आदर राखतो”, असेही निवेदनाच्या शेवटी लिहिले आहे.

काय आहे प्रकरण?
गौतम अदानी, सागर अदानी, विनीत एस जैन यांनी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलून ही लाचेची रक्कम उभी केल्याचा आरोप आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत अदानींसह सर्वांनी भारत सरकारसाठी कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून २० वर्षांत २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त नफा होईल, असा अंदाज होता, असेही आरोपात म्हटलेय.

न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन फेडरल कोर्टात त्यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सौरऊर्जा कंत्राट मिळवण्यासाठी लाच देणे आणि सुमारे २ अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा अदानींवर आरोप आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या