Wednesday, November 20, 2024
Homeदेश विदेशभारतात मंकिपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला! त्या रुग्णाचा अहवाल आला पॉझिटीव्ह

भारतात मंकिपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला! त्या रुग्णाचा अहवाल आला पॉझिटीव्ह

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याची भीती व्यक्त केली असून या व्यक्तीला रुग्णालयात आयसोलेट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. कोविड-१९ महामारीनंतर मंकीपॉक्स व्हायरसने जगाबरोबरच भारतातही चिंताजनक परिस्थिती आहे. पण या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

‘मंकीपॉक्स’ या विषाणूजन्य संसर्गाचा जगात वेगाने फैलाव होण्याचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने ऑगस्टमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की एमपॉक्सच्या संशयित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. युवकाला एमपॉक्स आहे की नाही याची खातरजामा करण्यासाठी त्याचे नमून घेतले आहेत. त्याची चाचणी सुरु आहे. अनावश्यक घाबरण्याची गरज नाही असे आरोग्य मंत्र्यालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

भारतात याचा एक संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर mpox च्या प्रकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळीच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवीन ॲडव्हाजरी जारी केली आहे.

राज्यांनी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांकडे विशेष लक्ष द्यायला हवे. विशेषत: त्वचा आणि गुप्तरोग उपचार क्लिनिकनी mpox ची सामान्य लक्षणे आणि निदानानंतर कराव्या लागणाऱ्या उपचाराबद्दल जागरुक राहण्याची गरज असल्याचे ॲडव्हाजरीमध्ये नमूद केले आहे.

एमपॉक्स संबंधी केंद्र सरकारने पावले उचलली आहे. या आजाराची टेस्टिंग कीट तयार केली जात आहे. सीडीएससीओंनी एमपॉक्सचा शोध घेण्यासाठी तीन टेस्टिंग किटना मंजूरी दिली आहे. आरटी-पीसीआर किट तपासणीसाठी पॉक्सच्या चकत्यांतून तरल पदार्थाचा नमूना काढून त्याची तपासणी केली जाते.

mpox ची लक्षणे?
Mpox जवळच्या संपर्कातून पसरू शकतो. सामान्यतः तो सौम्य असतो, पण दुर्मिळ प्रकरणांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो. फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. शरीरावर पुरळ उठतात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या