Sunday, May 18, 2025
Homeनाशिकमालेगावात एकाच दिवशी पाच दगावले; नवीन सहा करोना बाधितांची आज भर; रुग्णसंख्या...

मालेगावात एकाच दिवशी पाच दगावले; नवीन सहा करोना बाधितांची आज भर; रुग्णसंख्या ११६ वर

नाशिक/मालेगाव | प्रतिनिधी 

- Advertisement -

मालेगाव शहरात करोना बाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना मृतांची संख्याही झपाट्याने वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. काल (दि.२३) एकाच दिवशी मालेगावात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन करोना बाधित तर इतर दोघे संशयित रुग्ण असल्याचे समजते. यासोबतच आज सकाळी आलेल्या अहवालाअंती मालेगावमध्ये आणखी सहा रुग्ण बाधित आढळून आले आहेत. सर्व रुग्ण संगमेश्वर परिसरातील असलायचे कळते.

वाढलेली आकडेवारी चिंतीत करणारी असून जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगावबाबत आज विशेष बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात केले आहे.  आतापर्यंत मालेगावमध्ये १३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे तर एकूण बाधित रुग्णांचा आकडा ११६ वर पोहोचला आहे.

आतापर्यंत मालेगावमध्ये  १३ बाधित रुग्ण दगावले आहेत तर मागील दोन संशयित आणि काल मृत्यू झालेले दोन्ही संशयित यांचे अहवाल अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. आज मालेगावात दगावलेले तिघेही रुग्ण जीवन हॉस्पिटलमधील असल्याचे समजते.

आजच्या वाढलेल्या आकडेवारीमुळे सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी १३० वर पोहोचली आहे. यामध्ये मालेगाव शहरात ११६, नाशिक शहरात १०, नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यात ०४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये एक निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील पहिला कोरोना बाधित रुग्ण करोना मुक्त झाला आहे. तर नाशिक शहरातील गोविंद नगर परिसरातील रुग्ण करोनामुक्त झाला आहे.

मालेगाव शहरात आतापर्यंत १३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मालेगावमध्ये सुरुवातीला जे अटकाव क्षेत्र होते त्याच्या बाहेरील रुग्ण मालेगावात आढळून आल्यामुळे अटकाव क्षेत्रांची संख्या वाढविली आहे. मालेगावातील रुग्णसंख्या यासोबत मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...