Friday, May 16, 2025
Homeधुळेपाचशे निराधार, विधवा महिलांना साडीचा आहेर

पाचशे निराधार, विधवा महिलांना साडीचा आहेर

बोराडी Boradi.। वार्ताहर

- Advertisement -

शिरपूरातील करवंद नाका परिसरात जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे (Public Welfare Charitable Foundation) यंदा ही दिवाळी साजरी करूया गरीबांच्या दारी, (This year let’s celebrate this Diwali door of the poor) या मोहिमेतंर्गत (Under the campaign) भाऊबीजनिमित्त उघड्यावर उदरनिर्वाह करणार्‍या निराधार (baseless), गरजु (needful) व कोरोना काळात झालेल्या एकल विधवा -single widowed sister= भगिनी अशा एकुण 500 वर महिलांना साडीचा -Distribution of sarees=आहेर वाटप करण्यात आला.

फैजपूर येथे आज स्वयंभू पांडुरंगाचा रथोत्सव 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार आबा महाजन हे होते. तर गटविकास अधिकारी संजय सोनवणे, पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक ध्रुवराज वाघ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, मर्चेन्ट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, नगरसेवक गणेश सावळे, अजंदे येथील सरपंच राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे, लौकी येथील माजी सरपंच भीमसिंग राजपूत, शिक्षण मंडळ डायरेक्टर सुरेश चौधरी, भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज, अ.भा.वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील, भामपुर येथील पोलिस पाटील संभाजी बोरसे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप येशी, सेवा निवृत्त कॅशियर रामचंद्र पवार, महा.नाभिक महामंडळाचे ज्येष्ठ सल्लागार भरत येशी, इंजि.भालचंद्र वाघ, इंजि.पद्माकर शिरसाठ, भारत मंड़प अँड कैटरर्सचे संचालक जीवन चौधरी, साँईसा प्रॉपर्टी ब्रोकरचे संचालक दिनेश ठाकुर, सुशांत एल.आय.सी सेवाचे संचालक किरण पाटील आदी उपस्थित होते.

महिलेचा विनयभंग केल्यानंतर तरुणाचे विष प्राशन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवि यशवंत निकवाड़े यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध हास्य अभिनेता विजय पवार यांनी निराधार, गरजु व विधवा माता भगिनींना आपल्या हास्य विनोदाच्या माध्यमातून भाऊबिज विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात 500 हुन अधिक निराधार, गरजु व विधवा माता भगिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साडीचा आहेर जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन, उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांच्यातर्फे अनेक प्रतिष्ठित व दानशूर नागरिकांच्या आर्थिक व वस्तु रूपाच्या सहकार्याने देण्यात आले

वाळू माफियाने काढली तलाठ्यांच्या दुचाकीची चावी

प्रसंगी तहसीलदार आबा महाजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानच्या कामाचे कौतूक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करवंद येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य अशोक भाईदास पाटील, जीवन चौधरी, नीतेश माहेश्वरी, प्रेमसिंग राऊळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन, उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी, खजिनदार कुलदीप राजपूत, सचिव हेमलता येशी यांच्या माध्यमातुन करण्यात आले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...