Friday, May 3, 2024
Homeजळगावराजमालती नगरातील दंगलप्रकरणी पाच संशयितांना अटक

राजमालती नगरातील दंगलप्रकरणी पाच संशयितांना अटक

जळगाव – Jalgaon

शहरातील राजमालती नगर येथे शनिवार १ मे रोजी दोन गटात दंगल झाल्याची घटना घडली होती.

- Advertisement -

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्पर विरोधात २८ ते ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सोमवारी पोलिसांनी आणखी दोन्ही गटातील पाच संशयितांना अटक केली आहे.

रिजवान गफूर पटेल वय २३ व कलीम हरुण पटेल वय २८ दोघे रा. राजमालती नगर तसेच दुसर्‍या गटातील विजय पांडुरंग सुरवाडे वय ६०, राजकुमार अजय सुरवाडे वय २४, विलास कालू ब्र्राम्हणे वय ३१ तिघे रा. राजमालती नगर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

मुलीची ओढणी ओढणे व क्रिकेट खेळण्यावरुन १ मे रोजी राजमालती नगरात दंगल झाल्याची घटना घडली होती. लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडचाही यावेळी हाणामारीत वापर झाला होता.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री दोन्ही गटाच्या विशाल अजय सुरवाडे, सिद्धार्थ माणिक वानखेडे, दर्शन विजय सुरवाडे, गौतम लक्ष्मण बिर्हाडे, राजू बिस्मिल्ला पटेल, मेहमूद बिस्मिल्ला पटेल,फैजान उर्फ आवेश राजू पटेल, इमरान उर्फ बबलू हारुन पटेल व जुनेद गफूर पटेल या नऊ संशयितांना अटक केली होती.

या संशयितांना न्यायालयाने रविवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून ते कोठडीत आहेत. या गुन्ह्यात आज सोमवारी शहर पोलिसांनी दोन्ही गटाच्या रिजवान गफूर पटेल वय २३ व कलीम हरुण पटेल वय २८ दोघे रा. राजमालती नगर तसेच दुसर्‍या गटातील विजय पांडुरंग सुरवाडे वय ६०, राजकुमार अजय सुरवाडे वय २४, विलास कालू ब्र्राम्हणे वय ३१ तिघे रा. राजमालती नगर या या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या