Thursday, September 19, 2024
Homeक्राईमदुचाकीच्या डिक्कीतून पाच लाख रुपये लंपास

दुचाकीच्या डिक्कीतून पाच लाख रुपये लंपास

नाशिक । प्रतिनिधी Nasik

- Advertisement -

बँकेतून ५ लाखांची रोकड काढून घराकडे परततांना, ६५ वर्षीय व्यक्ती रस्त्याजवळील किराणा दुकानात फरसाण घेण्यासाठी थांबले. गाडी लावून ते फरसाणच्या दुकानात शिरत असतानाच, अवघ्या काही मिनिटात संशयित चाेरट्यांनी त्यांच्या मोपेडच्या डिक्कीतील पाच लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासाकामी ताब्यात घेतले आहेत.

संजय पांडुरंग मंडलिक (वय ६५, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते सेवानिवृत्त आहेत. नाशिकरोडच्या एसबीआय बँकेमध्ये त्यांचे खाते असून, घरगुती कामासाठी त्यांना पैसे लागत होते. त्यासाठी ते बुधवारी (दि. ११) दुपारी एसबीआय बँकेत गेले. बँकेच्या खात्यातून ५ लाख रुपये काढले आणि ती रोकड त्यांनी त्यांच्या ज्युपीटर मोपेडच्या (एमएच १५ एचडब्ल्यू ०२३८) डिक्कीत ठेवले. त्यानंतर ते परत घराकडे परतत असताना, रेल्वे स्टेशनरोडवर असलेल्या एटूझेड किराणा दुकानासमोर फरसाण घेण्यासाठी थांबले.

अवघ्या काही मिनिटात ते दुकानातून फरसाण घेऊन परत आले असता, डिक्कीत फरसाण ठेवण्यासाठी उघडली. त्यावेळी डिक्कीत पाच लाखांची रोकड नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. तत्काळ नाशिकरोड पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक सूर्यंवंशी हे तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या